अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद श्री सद्गुरू वामनबाबा महाराजांची आरती
शके सत्राशे सत्यांशी पौष श्री मासी || कृष्णाष्टमि दिन अिंदु कल्हे कुलाब्यासी ||
नारायण-सगुणात्मज अवतारा घेसी || वामननामोच्चारे तापत्रय हरसी || 1 ||
जयदेव जयदेव जय वामनबाबा || श्री सद्गुरूबाबा ||
परमार्थे आरती, सदभावे आरती || करितो मी धावा || जयदेव जयदेव || धृ ||
शांति-सौख्यधाम कैवल्य ठेवा || निशिंदिनी करि तव सेवा || कृपावर द्यावा ||
भव-भय-मिंथ्या-माया षड्रिंपु मर्दाया || चरणांबुजि या ब्रह्मी मस्तक ठेवूं याा || 2 ||
जयदेव जयदेव || धृ ||
राम-कृष्ण-वामन सानंद मूर्ती || सगुणब्रह्माकार चैतन्यशक्ति ||
ज्ञान-दया-क्षम भूती अद्वैत नीतिं || अगाध महिमा तुमचा जडजीवां मुक्ति || 3 ||
जयदेव जयदेव || धृ ||
पुंडलीक-तुकया-सम-श्रेष्ठ भक्ति || पंढरपुरिची वारी परब्रह्म भेटी ||
भागवदधर्म प्रसारी चंदन-तरू-तनु-ती || अचिरान्नय विष्णुत्वीं पदंघ्रि ते विनंती || 4 ||
जयदेव जयदेव || धृ ||
कायें-मनसा-वाचा बुद्धया अर्चियले || लवलाही गुरू माऊली धांवुनिया आले ||
दर्शन-स्मरणें-प्रेमे मन्मन दाटियले || भगवन्ताग्रज तन्मय वामन पदकमले || 5 ||
जयदेव जयदेव || धृ ||
|| सच्चिदानंद श्री सद्गुरूवे वामनार्पणमस्तु ||
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री सद्गुरूंची आरती
येई हो सद्गुरू नेत्र लागले वाटे | नेत्र लागले वाटे | चरणी मस्तक ठेविता स्वर्ग भेटे || धृ ||
चरण स्पर्श घेता पतित तरले | सद्गुरू पतित तरले | आशीर्वाद देऊनी कित्येका उद्धारिले || १ ||
तुमच्या दर्शने खरे सुख लाभते | सद्गुरू सुख लाभते | तुमच्याच नामे मज पावन केले || २ ||
वरदहस्त लागता पिडा दूर झाल्या | सद्गुरू पिडा दूर झाल्या | कित्येक पामरा सुख शांती मिळाल्या || ३ ||
तुम्ही ब्रह्मा तुम्ही महेश्वरा | सद्गुरू तुम्ही महेश्वरा | माता पिता होऊनी तारीला भवसागर || ४ ||
आता मागणे आहे जगन्नाथ दासाचे | जगन्नाथ दासाचे | अखंड घडो दर्शन तुमच्या चरणाचे || ५ ||
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
येई हो सद्गुरू माऊली ये
येई हो सद्गुरू माऊली ये | वाटेकडे नेत्र लाऊनी वाट पाहे || धृ ||
भेटीच्या आतुरतेने दिला निरोप | तुची तारक माझा मायबाप || १ ||
नेसला पितांबर भस्म कपाळा | शांतीचा सागर गळा रूद्राक्ष माळा || २ ||
तुमचे येणे आम्हा वाटे दीपावली | दत्तदास जगन्नाथ आरती ओवाळी || ३ ||
एकचि निश्चय भाव तुमच्या ठाया | कृपा दृष्टी पाहे माझ्या सद्गुरू राया || ४ ||
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री आप्पा माऊलीची आरती
जय जय आप्पा माऊली करी कृपेची साऊली | आरती ओवाळली | सदभावे पद्कमळी || धृ ||
वामनानी दिली स्फूर्ती | तुमची अगाध किर्ती | विठ्ठला सम मूर्ती | सदभावे करू आरती || १ ||
सद्गुरू तुम्ही श्रेष्ठ | चरणाशी तीर्थ अष्टा सर्वावरी कृपा दृष्टी | सर्व पिडा होई नष्ट || २ ||
कित्येक पामराशी | नेले भक्ती मार्गाशी | दिव्य दृष्टी देशी | जाळशी पापराशी || ३ ||
हिराजी बुवाला | विठ्ठल भेटविला | तसेची अनंताला | कीर्तनी रंगविला || ४ ||
एकादशी आषाढीला | पायी वारी पंढरीला | संगे शिष्य मेळा | भक्ती मळा फुलविला || ५ ||
दहिवलकर महाराजाला | तव वरद हस्त लाभला | दत्त लळा लावला | आणि सन्मान केला || ६ ||
ऐसे गुण तव गाता | मती न पुरे आता | कृपा ठेवी जगन्नाथा | सद्गुरू समर्था || ७ ||
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री दहिवलीकर महाराजांची आरती
आरती जगन्नाथा | चरणी ठेऊनी माथा |
किर्ती तुमची थोर | सांभाळी मज आता ||
आरती जगन्नाथा ||
कित्येक पामराशी | तुम्ही पावन केलेशी |
कृपादृष्टी होता | नष्ट होई सर्व चिंता ||
आरती जगन्नाथा ||
दहिवलीकर नाम थोर | दत्त भक्ती अपार |
दत्ताचा तू अवतार | करी भव दु:ख पार ||
आरती जगन्नाथा ||
जगन्नाथ नाम घेता | शांती मिळाली चिता |
दहिवलीकर दास राम | मति गुंग गुण गाता ||
आरती जगन्नाथा ||
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री महादेवानंदजी बांबरकर महाराजांची आरती
आरती महादेव नाथा || पायी ठेवूनी माथा ||
किती वर्णावें गुणा || सांभाळी भक्त जना ||
आरती महादेव नाथा || धृ ||
जगन्नाथे रचिला पाया | ज्ञानदेवें लाविले सेवेले ||
नारायणे कळस चढविला | गुरूमाऊली मुख्य पदाला ||
आरती महादेव नाथा || १ ||
कित्येका देवूनी दृष्टांत | नष्ट केले पाप क्लशे ||
तोडी भक्तांचा भवपाश | उद्धरिले तू जना ||
आरती महादेव नाथा || २ ||
धन्यवंशी बांबरकर | घेई जन्म अवतार ||
करी भक्तांचा सांभाळ | नेई मोक्ष पदाला ||
आरती महादेव नाथा || ३ ||
नाम घेता महादेव | शांती देई भगवंत ||
धन्य जक्षी अवतार | तारीले भक्त जना ||
आरती महादेव नाथा || ४ ||
पू्र्व-पुण्याचा लाभ झाला | जगन्नाथे आशीर्वाद दिला ||
दत्त भक्ती लावला | आणि दत्तरूपी झाला ||
आरती महादेव नाथा || ५ ||