प्रिय भक्तगण

भगवंताने दर्शविलेल्या दहा (मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की) अवतारांचा विचार करीता चालू काळ हा कलियुगाचा आहे. या कलियुगात धर्मावरील श्रद्धा उडत चालली आहे. स्वत:ला नास्तिक समजणारी व्यक्तीही मंदिरातील मूर्तीकडे पाहून प्रसन्न होते आणि मनातल्या मनांत नकळत का होईना विनम्र होतेच.

श्री भगवंत हेच सद्गुरू आहेत. श्री सद्गुरू हे कधीच शिष्य करीत नाहीत तर ते सद्गुरू तयार करीत असतात. शिष्याचे शरीर हे सद्गुरूसाठी ईश्वराचे मंदिर आहे. सद्गुरूंनी दिलेले नाम हे केवळ नाम अक्षर किंवा शब्द नाही. या नामामध्ये या शक्तीचा संचार हीच सद्गुरूंची दिक्षा आहे.

ईश्वराची शक्ती सर्वांमध्ये आहे. शिष्याच्या शक्तीला जागृत करण्याला शक्ती संचार असे म्हणतात. ही शक्ती निद्रावस्थेत असते. जे लोक श्वास प्रश्वासावर नामजप करत तिला पुन्हा झोपू देत नाहीत. त्या व्यक्तीमध्ये ती शक्ती विशेष करून कार्य करीत असते.

वृक्षाप्रमाणे सहनशील व्हावे. धन सन्मान इत्यादी गुणांनी श्रेष्ठ राहूनही या सर्वांचा गर्व करू नये. आपल्या अभिमानाचा त्याग करून नामजप केल्याने फळ प्राप्त होते. यासाठी धर्मग्रंथाचे वाचन, गुरू आज्ञेचे पालन आणि माता पिता गुरूजन यांची सेवा आवश्यक आहे.



आहाराशी धर्माचा संबंध आहे. शरीर आणि आत्मा एकत्रच राहतात. हा आहार योग्य रूपात केला नाही तर धर्म नष्ट होतो. प्रत्येक घासाला नामजप केला पाहिजे. भोजनाचे प्रमाण आणि वेळ योग्य ठेवल्यास शरीराबाबत कोणताही त्रास राहत नाही.

रात्री झोपण्यापूर्वी सकाळी, उठण्याच्यावेळी साधन, भजन करण्याच्या आधी आणि ते झाल्यावर खाली दिलेल्या मंत्राचे स्मरण करीत नमस्कार करावा. ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: || 

सत्ययुगात ध्यान आणि यज्ञ हाच धर्म आहे. तर त्रेतायुगात ज्ञान आणि यज्ञ व धर्म सांगितला आहे. द्वापारयुगातला धर्म देवता आणि संत महात्मे यांच्याशी परिचर्या आणि त्याची पूजा आहे. तर कलियुगात फक्त नामजप आणि दान हाच धर्म सांगितला आहे.

गाईला जर दुसरीकडे न्यावयाचे असेल तर गुराखी तिच्या वासराला घेऊन पुढे चालतो, जेणेकरून गाय इकडे तिकडे न पाहता वासराच्या मागे चालू लागते. त्याचप्रमाणे परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या चरणांचा आश्रय घेतलेल्या भगवद् भक्तांना शरण जा. अशा तऱ्हेने जो भगवद् भक्तांचा आश्रय घेऊन आत्मसमर्पण करतो. त्याच्याविषयी परमेश्वर नेहमीच काळजी घेतो.

कलियुगात फक्त नाप जप आणि दानधर्म हाय सांगितला आहे. आहार निद्रा, भय आणि मैथून यांचा संयम पाळणे आवश्यक आहे. धन किंवा पैसा कितीही मिळाला तरी मनाची कधीही तृप्ती ाव आहे.होत नाही. असा मनाचा स्वभावच आहे. कनक आणि कांता या दोनच गोष्टी सर्व अनिष्ठांचे मूळ आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी श्रद्धा असणे आवश्यक आहे. ती जर नसेल तर कुणाचे घरदार, कुणाच्या गायी-म्हशी? जरी राम नाम न घेशी | आत्मा जाईल उपाशी || अशाप्रमाणे होईल. त्यातून बाहेर पडण्यासाठी अखंड नाम जप, साधना श्वास प्रश्वासावर करत राहणे, आवश्यक आहे. त्यानेच आपल्याला सर्व काही प्राप्त होईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात श्री क्षेत्र रायपाटण इथल्या दत्त मंदिरात आजपर्यंत हजारो लोक व्यसनमुक्त झाले आहेत. पिशाच्चबाधा, जादू-टोना, संतती दोष, इतर दोष, व्यापारातील अडचणी, गृह दोष इत्यादी सर्व प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेले लोक सद्गुरू आशीवार्दाने सखी झााले आहेत.

तुम्हा सर्वांची परमेश्वर उत्तरोत्तर भरभराट करून त्यांना आयु-आरोग्य प्राप्त होवो, ही दत्त चरणी प्राथर्ना!


                                                                      दत्तदासांचे दीनदास स्वामी महादेवानंदजी बांबरकर

                                                           दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटण 

श्री सद्गुरूंची आरती


 

अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद श्री सद्गुरू वामनबाबा महाराजांची आरती

शके सत्राशे सत्यांशी पौष श्री मासी || कृष्णाष्टमि दिन अिंदु कल्हे कुलाब्यासी ||

नारायण-सगुणात्मज अवतारा घेसी || वामननामोच्चारे तापत्रय हरसी || 1 ||

जयदेव जयदेव जय वामनबाबा || श्री सद्गुरूबाबा ||

परमार्थे आरती, सदभावे आरती || करितो मी धावा || जयदेव जयदेव || धृ ||

शांति-सौख्यधाम कैवल्य ठेवा || निशिंदिनी करि तव सेवा || कृपावर द्यावा ||

भव-भय-मिंथ्या-माया षड्रिंपु मर्दाया || चरणांबुजि या ब्रह्मी मस्तक ठेवूं याा || 2 || 

जयदेव जयदेव || धृ ||

राम-कृष्ण-वामन सानंद मूर्ती || सगुणब्रह्माकार चैतन्यशक्ति ||

ज्ञान-दया-क्षम भूती अद्वैत नीतिं || अगाध महिमा तुमचा जडजीवां मुक्ति || 3 ||

जयदेव जयदेव || धृ ||

पुंडलीक-तुकया-सम-श्रेष्ठ भक्ति || पंढरपुरिची वारी परब्रह्म भेटी ||

भागवदधर्म प्रसारी चंदन-तरू-तनु-ती || अचिरान्नय विष्णुत्वीं पदंघ्रि ते विनंती || 4 ||

जयदेव जयदेव || धृ ||

कायें-मनसा-वाचा बुद्धया अर्चियले || लवलाही गुरू माऊली धांवुनिया आले ||

दर्शन-स्मरणें-प्रेमे मन्मन दाटियले || भगवन्ताग्रज तन्मय वामन पदकमले || 5 ||

जयदेव जयदेव || धृ ||

|| सच्चिदानंद श्री सद्गुरूवे वामनार्पणमस्तु ||

             

श्री सद्गुरूंची आरती

येई हो सद्गुरू नेत्र लागले वाटे |  नेत्र लागले वाटे | चरणी मस्तक ठेविता स्वर्ग भेटे || धृ ||

चरण स्पर्श घेता पतित तरले | सद्गुरू पतित तरले | आशीर्वाद देऊनी कित्येका उद्धारिले || १ ||

तुमच्या दर्शने खरे सुख लाभते | सद्गुरू सुख लाभते | तुमच्याच नामे मज पावन केले || २ ||

वरदहस्त लागता पिडा दूर झाल्या | सद्गुरू पिडा दूर झाल्या | कित्येक पामरा सुख शांती मिळाल्या || ३ ||

तुम्ही ब्रह्मा तुम्ही महेश्वरा | सद्गुरू तुम्ही महेश्वरा | माता पिता होऊनी तारीला भवसागर || ४ ||

आता मागणे आहे जगन्नाथ दासाचे | जगन्नाथ दासाचे | अखंड घडो दर्शन तुमच्या चरणाचे || ५ ||

             

येई हो सद्गुरू माऊली ये

येई हो सद्गुरू माऊली ये | वाटेकडे नेत्र लाऊनी वाट पाहे || धृ ||

भेटीच्या आतुरतेने दिला निरोप | तुची तारक माझा मायबाप || १ ||

नेसला पितांबर भस्म कपाळा | शांतीचा सागर गळा रूद्राक्ष माळा || २ ||

तुमचे येणे आम्हा वाटे दीपावली | दत्तदास जगन्नाथ आरती ओवाळी || ३ ||

एकचि निश्चय भाव तुमच्या ठाया | कृपा दृष्टी पाहे माझ्या सद्गुरू राया || ४ ||


             

श्री आप्पा माऊलीची आरती

जय जय आप्पा माऊली करी कृपेची साऊली | आरती ओवाळली | सदभावे पद्कमळी || धृ ||

वामनानी दिली स्फूर्ती | तुमची अगाध किर्ती | विठ्ठला सम मूर्ती | सदभावे करू आरती || १ ||

सद्गुरू तुम्ही श्रेष्ठ | चरणाशी तीर्थ अष्टा सर्वावरी कृपा दृष्टी | सर्व पिडा होई नष्ट || २ ||

कित्येक पामराशी | नेले भक्ती मार्गाशी | दिव्य दृष्टी देशी | जाळशी पापराशी || ३ ||

हिराजी बुवाला | विठ्ठल भेटविला | तसेची अनंताला | कीर्तनी रंगविला || ४ |

एकादशी आषाढीला | पायी वारी पंढरीला | संगे शिष्य मेळा | भक्ती मळा फुलविला || ५ ||

दहिवलकर महाराजाला | तव वरद हस्त लाभला | दत्त लळा लावला | आणि सन्मान केला || ६ ||

ऐसे गुण तव गाता | मती न पुरे आता | कृपा ठेवी जगन्नाथा | सद्गुरू समर्था || ७ ||

             

श्री दहिवलीकर महाराजांची आरती

आरती जगन्नाथा | चरणी ठेऊनी माथा | 

किर्ती तुमची थोर | सांभाळी मज आता || 

आरती जगन्नाथा ||

कित्येक पामराशी | तुम्ही पावन केलेशी | 

कृपादृष्टी होता | नष्ट होई सर्व चिंता || 

आरती जगन्नाथा ||

दहिवलीकर नाम थोर | दत्त भक्ती अपार |

दत्ताचा तू अवतार | करी भव दु:ख पार || 

आरती जगन्नाथा ||

जगन्नाथ नाम घेता | शांती मिळाली चिता | 

दहिवलीकर दास राम | मति गुंग गुण गाता || 

आरती जगन्नाथा ||


             

श्री महादेवानंदजी बांबरकर महाराजांची आरती

आरती महादेव नाथा || पायी ठेवूनी माथा || 

किती वर्णावें गुणा || सांभाळी भक्त जना || 

आरती महादेव नाथा || धृ ||

जगन्नाथे रचिला पाया | ज्ञानदेवें लाविले सेवेले ||

नारायणे कळस चढविला | गुरूमाऊली मुख्य पदाला || 

आरती महादेव नाथा || १ ||

कित्येका देवूनी दृष्टांत | नष्ट केले पाप क्लशे || 

तोडी भक्तांचा भवपाश | उद्धरिले तू जना || 

आरती महादेव नाथा || २ ||

धन्यवंशी बांबरकर | घेई जन्म अवतार ||

करी भक्तांचा सांभाळ | नेई मोक्ष पदाला || 

आरती महादेव नाथा || ३ ||

नाम घेता महादेव | शांती देई भगवंत ||

धन्य जक्षी अवतार | तारीले भक्त जना || 

आरती महादेव नाथा || ४ || 

पू्र्व-पुण्याचा लाभ झाला | जगन्नाथे आशीर्वाद दिला ||

दत्त भक्ती लावला | आणि दत्तरूपी झाला || 

आरती महादेव नाथा || ५ ||

श्री दत्त संप्रदाय आणि उपासना


दत्तसंप्रदाय हा प्रत्यक्षवादी, सगुणवादी आहे. जीवनाला आवश्यक असलेल्या मंत्रशास्त्राचे संवर्धन करण्याचे महान कार्य आजवर दत्तसंप्रदायाने केले आहे. आपल्या भारतात जे अनेकानेक धार्मिक संप्रदाय आहेत त्यात दत्तसंप्रदायहा एक प्रमुख संप्रदाय मानला जातो. यालाच अवधूत संप्रदायअसेही संबोधिले जाते. दत्तात्रेयहे या संप्रदायाचे आराध्य दैवत होय !शैव, वैष्णव व शाक्त या तीनही उपासना प्रवाहांना व्यापणारा दत्तात्रेयांचा प्रभाव सर्व भारतभर गाजत आहे. आपल्या महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, सांप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. महानुभाव, नाथ, वारकरी आणि समर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्रि अनसूयेचे पुत्र आहेत; परंतु ते अयोनिसंभव आहेत.
महाराष्ट्रातील दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संपद्राय या चारही संप्रदायांत दत्तात्रेयांविषयी गाढ श्रद्धा आहे. तसेच दत्तभक्तीचीच परंपरा विशेष करून चालविणारा दत्तसंप्रदायही महाराष्ट्रात शेकडो वर्षे अस्तित्वात आहे.
दत्तोपासनेमुळेच अशा सिद्धी दत्तोपासकांना प्राप्त होतात आणि त्यांच्या साहाय्याने ते आपली दु:खे दूर करू शकतात. आपल्या कामनांची पूर्ती करू शकतात. ही जी भावना सर्वसामान्यांच्या मनात प्रथमपासून रूजत गेली. त्यातच दत्तसंप्रदायाच्या भक्तप्रियतेचे रहस्य दडलेले आहे. केवळ दर्शन-स्पर्शाने वा आशीर्वादाने सिद्धपुरूषांनी आपल्या व्यथा-वेदना त्वरित नाहीशा करून मनोकामना पूर्ण कराव्यात. अशीही बहुतेक भक्तांची किमान अपेक्षा असते. दत्तात्रेयांची उपासना गुरूस्वरूपात करावयाची असते. कारण ते 'गुरूदेव' आहेत. परिणामी गुरू संस्थेला प्राधान्य देणाऱ्या सर्व संप्रदायात दत्तात्रेयांची पूज्यता रूढ झाली.

श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या.

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी

कारंजा (लाड) जि. वाशिम या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी श्रीनृसिंहसरस्वती म्हणून जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला.

श्री स्वामी समर्थ

आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली.

श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.

श्रीमाणिकप्रभू

बिदरजवळील हुमणाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात.  ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर  येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. 

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी

श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते.

|| श्री  ॐ श्रीगुरूदेव दत्तात्रेयायनम: | श्री वासुदेवानंद सरस्वतीकृत ||

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर, यज्ञसप्ताह २०२० काल्याचे कीर्तन


श्री क्षेत्र रायपाटण दत्तमंदिर तर्फे सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता प्रमुख विश्वस्त यांच्य शुभहस्ते वीणा पूजन झाले. त्या नृसिंह सरस्वती व माऊली यांच्य प्रतिमेस हार घालून गुरूचरित्र ग्रंथाचे पारायण सुरु केले.

यज्ञसप्ताहात ह.भ.प. घनश्याम मोकल महाराज (उरण), ह.भ.प. नामदेव दळवी महाराज (मुंबई), ह.भ.प. पुंडलिक पांचाळ महाराज (मु.पो.जांभवडे), ह.भ.प. दौलत महाराज पाटेकर (कोळंब) यांनी प्रवचन व कीर्तन सादर केले. त्यांना मृदंगवर ह.भ.प. मारूती पांचाळ (जांभवडे), ह.भ.प. परशुराम लखु बांबरकर (रायपाटण) यांनी साथ दिली. तर कीर्तनास साथ ह.भ.प. राजाराम सुतार (करक), ह.भ.प. दत्ताराम पाटेकर  (कोळंब) आणि ह.भ.प. यशवंतबुवा पांचाळ (जांभवडे) यांनी साथ दिली. गायक म्हणून ह.भ.प. सहदेव सुतार (कळंब), ह.भ.प. विठ्ठलबुवा पांचाळ (जांभवडे), ह.भ.प. यशवंतबुवा पांचाळ (जांभवडे) आणि ह.भ.प. पुंडलिकबुवा पांचाळ (जांभवडे) यांनी साथ दिली.

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर आयोजित यज्ञसप्ताह २०२०

आनंदमयी पालखी सोहळा

मंदिरात पारायणाला बसलेले शिष्य परिवार

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज. 

विणेकरी

विणेकरी

पालखी

|| अखंड हरिनाम सप्ताह || वर्ष २९ वे


परमपूज्य चैतन्य श्री सदगुरू आप्पा माऊली आणि श्री चैतन्य सदगुरू दत्तदास दहिवलीकर महाराज 
यांच्या कृपादृष्टीखाली श्री गुरूचरित्रे, श्री ज्ञानेश्वरी व नवनाथ या ग्रंथाचे सामुदायिक पारायण.
सर्व भाविकांना कळविण्यात अत्यानंद वाटतो की, प.पू.सदगुरू दत्त दासाचे दिनदास स्वामी महादेवानंदजी तथा माधव सरस्वती (बांबरकर महाराज) यांच्या सौजन्याने मिती माघ शुक्ल पक्ष नवमी शके १९४१ सोमवार दि. ३ फेब्रुवारी, २०२०, ते माघ शुक्ल पक्ष द्वादशी गुरूवार ६ फेब्रुवार, २०२० पर्यंत अखंड हरिनाम यज्ञसप्ताह सोहळा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील संत महात्मांचे कीर्तन, प्रवचन द्वारा ज्ञानदान, भजनानंद व भक्तीप्रेम मिळणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा।

सूचना : संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेसाठी येथे || अखंड हरिनाम यज्ञसप्ताह || क्लिक करा.