दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरातील काकड आरती

दत्तदास दत्तमंदिर

श्री क्षेत्र रायपाटण दत्तदास दहिवलीकर महाराजांची काकड आरती

(वेळ पहाटे ५.०० वाजता)

-  १ -

दहिवलीकर महाराज

उठा उठा हो दत्तदास देवा, सदगुरू जगन्नाथ देवा |

भक्ति भावे करितो काकडा, मजवर कृपादृष्टि ठेवा || धृ ||

सदगुरू - २ बहुजनांचे दु:ख निवारूनी तव, नित्य भाविकांसी उद्धारिले | 

कळंब ग्रामी जन्म घेऊनी तया, सद्गुरू समाधिस्त झाले || १ ||

तव समाधि दर्शनमात्रे, सदगुरू भव दु:ख हारे | 

विशेष महिमा सदगुरू तव दर्शना, पौर्णिमा गुरूवासरे || २ ||

सदा स्मित हास्य, भाळी भस्म, गळा रूद्राक्ष माळा | 

वात्सल्यमूर्तित्वम् षड्भावशुन्यम् तव पदी नमन हे दीनदयाळा || ३ ||

तव कृपे सद्गुरू मज आत्मबोध झाला - सदगुरू - २ ||

मागणे हेची तव पदी आता सदगुरू रायपाटण क्षेत्री घडो दत्तसेवा || ४ ||

काकडा ओवाळीता, तव सुत म्हणे जगन्नाथा सद्गुरू दत्तदासा | 

चैतन्य स्वरूपम् सद्गुरू रूपम् मजकडूनी तव घडो नित्य सेवा || ५ ||

तव महिमा म्यां पामरा कैसा वर्णांवा, सद्गुरू नाही मज ठावा | 

परम भक्तिभावे, केला काकडा मी सद्गुरू पावन करूनी घ्यावा || ६ ||

(सद्गुरू दत्तदास दहिवलीकर महाराज देवता अर्पणमस्तु| )

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

- २ -

काकड आरती करितो दत्तदास देवा | सद्गुरू जगन्नाथ देवा |

निर्गुण रूप दाऊनी घ्यावी बालक नित्य सेवा || धृ ||

होम हवने बीज मंत्र जप करूनी काकडा केला |

सद्गुरू काकडा केला भाव भक्तिचे तूप घालूनी तो मी पेटविला || १ ||

कळंब क्षेत्री देह ठेवूनी दत्त रूपी झाला | सद्गुरू दत्त रूपी झाला | 

श्रद्धेचा तो धूप घालूनी मी तुज आळविला || २ ||

रूद्राचा अभिषेक करूनी तुजला आरती ओवाळू | सद्गुरू आरती ओवाळू ||

रायपाटण क्षेत्री फुले उधळुनी तुजला न्याहाळू || ३ ||

काम, क्रोध, मद, मोह, मत्सर मम जाळूनी टाकावा | सद्गुरू जाळूनी टाकावा ||

महादेव म्हणे मस्तक ठेवूनी करितो तव नमन मी पाया || ४ ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

काकड आरती

उठा उठा सकळ जन | घ्या आपुले हीत साधुन, नरदेह सांडूनी जाता |

मग कैसा भगवंत || धृ |उठा उठा भल्या पहाटेसी | चला जाऊ दत्त दर्शनासी 

जळतील पातकांच्या राशी | काकड आरती ऐकुनिया, उठूनि पहाटेच्या वेळी |

दत्त पहा निज मंदिरी चरण पहा न्याहाळूनि | अमृत दृष्टी लाऊनिया || १ ||

जागे करूया प्रभूराया | उठा उठा हो दत्तराया | उठा उठा हो दत्तराया |

निंबलोन करा वेगे | दृष्ट न लागो प्रभुशी || पुढे वाजवा चौघडा |

नगारा वाजे धडाडधडा | आरती करा धरा काकडा | माझ्या दत्त रायाची |

आरतीचा नाद घुमुद्या | सुगंधी धूप उधळास गेर होई महाद्वारा | दत्त दिगंबरा दिगंबरा || २ ||

---------- २ ----------

भक्ति भावे ओवाळू काकड ज्योती पंच प्राण अर्पु ओवाळू आरती || धृ ||

ओवाळितो आरती माझ्या दत्तराया | दोन्ही कर जोडूनी मस्तक ठेवितो पाया |

किती महिमा वर्णू न वर्णावे किती | ब्रह्मदत्यासम पापेही जळती || २ ||

धेनु मागे स्वान दोन्ही बाही | शंख डमरू त्रिशूळ शोभे ठायीं || ३ |

पाद्यपूजा करिता आरती ओवाळू तेज न्याहाळू || ४ |

काकड ओवाळीता जगन्नाथ म्हणे | दिगंबर दिगंबर स्फूरले हे गाणे || ५ ||