श्री क्षेत्र रायपाटण येथे बाळगोपाळ मेळावा - 2022 उत्साहात संपन्न

 दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाळगोपाळ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बाळगोपाळ मेळाव्यात शालान्त परीक्षेत व इतर शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच 'पढेगा भारत, बढेगा भारत' या केंद्र सरकारच्या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांना मंदिरातर्फे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास तालुक्यातील विद्यार्थी-पालक, शिक्षक, तसेच तालुक्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.