![]() |
दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्टतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. |
रायपाटण, ता. राजापूर. ( जि.रत्नागिरी) : राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने शैक्षणिक उपक्रमांतर्गत रायपाटण येथील दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी, दत्तमंदिर ट्रस्ट यांच्या मार्फेत जिजामाता विद्यामंदिर जि.प शाळा क्र, १, सरस्वती विद्यामंदिर तसेच किसान छात्रालय येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज तसेच महाराजांचे बंधू, मठाधिपती कै ज्ञानदेव जिजी महाराज यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्या संस्थेला या निमित्ताने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. यावेळी शाळांतील शिक्षक पदाधिकारी, विद्यार्थी महाराजांचे शिष्य श्री भाऊ कोळवणकर तसेच महाराजांच्या परिवारातील सदस्य विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थी आणि शिक्षकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. ट्र्स्टतर्फे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप सराव परीक्षा ही गेल्या अनेक वर्षापासून ट्र्स्टतर्फे घेण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतुने मंदिर ट्रस्टच्या वतीने अभंग गायन स्पर्धा आयोजित केली जाते. मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांना जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिकांचाही ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी सहभाग महत्वाचा असून त्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले.