दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर

आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना जयेशानंदजी बांबरकर महाराज. सोबत रेवण सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती रविशंकर शिवाचार्य महाराज.

2 नोव्हेंबर, 2021 :  श्री क्षेत्र रायपाटण इथे दत्तभक्तीची पताका रोवत गेली ३० वर्षाहून अधिक वर्षे अध्यात्मिक व सामाजिक कार्यासोबतच व्यसनमुक्तीचे कार्य करणारे दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुद्वादशी (दि. 2 नोव्हेंबर) दिपावली धनत्रयोदशीच्या अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांसाठी व सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन जयेशानंदजी बांबरकर महाराज यांच्या हस्ते आणि रेवण सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती रविशंकर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी रायपाटण उपजिल्हा रूग्णालयाचे सुप्रिटेंडंट डॉ. विकास शर्मा, जीवनदाता संस्थेचे अध्यक्ष राजेश नार्वेकर तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे, तसेच रायपाटण उपजिल्हा रूग्णालयाचे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, शिष्य परिवार, भाविक वर्ग उपस्थित होता.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य व रक्तदान शिबिरासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालय, जीवनदान ग्रुप, इन्फिगो आयकेअर सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी शिबिरात 70 हून अधिक नागरिकांनी आरोग्य व डोळे तपासणी करून घेतली. तर 25 हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरार्थींंना शुभेच्छा देताना. 

मंदिराच्यावतीने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह स्वीकारताना.

शिबिरास उपस्थित शिबिरार्थी.