चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज पादुका स्थापना

श्रीगुरू म्हणती नका करू दु:ख आम्ही असो याचिग्रामी ।।

मठी आमुच्या ठेवितो पादुका त्या पुरवतील मनोकामना ।।


चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज समाधी मंदिरातील पादुका स्थान.

चैतन्य सद्गुरू दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुद्वादशी- दिपावली धनत्रयोदशी (दि. २ नोव्हेंबर, २०२१) या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज समाधी मंदिरात स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. तसेच महाराजांच्या इच्छेनुसार दत्त महाराजांच्या गाभाऱ्यात श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती व चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुका.

या दोन भव्यदिव्य सोहळ्यानिमित्त बांबरकरवाडीतील दत्त मंदिरात १ आणि २ नोव्हेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.०० वाजता काकड आरतीपासून या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर रूद्र अभिषेक, गुरू पादुका आणि श्री नृसिंह सरस्वती मूर्ती पूजन विधी, समाराधना, शटप्रणम मृत्युंजय हवन पूर्णाहुती, आरती, भजन, हरिपाठ व महाप्रसाद आदी कार्यक्रम करण्यात आले. दरम्यान ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या पादुकांची ग्रामदेवता वडचाई मातेच्या मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्री क्षेत्र संगोबानाथ शिव मंदिराला लागून असलेल्या अर्जुना नदीचे पाणी महाराजांच्या पादुकावर जलाभिषेक करण्यासाठी आणले होते. या सोहळ्याद्वारे सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पंचक्रोशीतील शिष्य परिवार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती आणि चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुकांचे विधिवत शिष्य परिवरांच्या उपस्थित पूजन करताना.