रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा - २०२१

 दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटणता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी नव्याने पुन्हा एकदा लिंक ओपन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत अव्वल यश मिळवावे.

 

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर पहिला मराठी व गणित - https://forms.gle/1mwwncdPqArDKdAM8

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इंग्रजी व बुद्धिमत्ता - https://forms.gle/X9TjK1anAd1SXjvv5

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर पहिला मराठी व गणित - https://forms.gle/DVXDcqqWvPbvkMXv9

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इंग्रजी व बुद्धिमत्ता - https://forms.gle/FKA5vnTUPM5WAcLz8

 

सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

 

|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||

ऑनलाईन शिष्यवृत्ती सराव परीक्षा - २०२१ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी 

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात अखंड हरिनाम सप्ताह, यज्ञ सप्ताह, दत्त जयंती, विश्वशांती यज्ञ यासोबतच बालगोपाळ मेळावा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, चित्रकला-अभंग गायन स्पर्था आदींचे ही आयोजन केले जाते. तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा. यासाठी कित्येक वर्षापासून मंदिराच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन केले जाते. यास शिक्षण विभागाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.  यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गुगल फॉर्मद्वारे ही सराव परीक्षा प्रथमच Online घेण्यात आली. आपल्या महाराजांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे या सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ऑनलाईन परीक्षेत २००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांनी सुरू केलेला हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ सुवर्णकाळ ठरवणारा आहे.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरातील काकड आरती

दत्तदास दत्तमंदिर

श्री क्षेत्र रायपाटण दत्तदास दहिवलीकर महाराजांची काकड आरती

(वेळ पहाटे ५.०० वाजता)

-  १ -

दहिवलीकर महाराज

उठा उठा हो दत्तदास देवा, सदगुरू जगन्नाथ देवा |

भक्ति भावे करितो काकडा, मजवर कृपादृष्टि ठेवा || धृ ||

सदगुरू - २ बहुजनांचे दु:ख निवारूनी तव, नित्य भाविकांसी उद्धारिले | 

कळंब ग्रामी जन्म घेऊनी तया, सद्गुरू समाधिस्त झाले || १ ||

तव समाधि दर्शनमात्रे, सदगुरू भव दु:ख हारे | 

विशेष महिमा सदगुरू तव दर्शना, पौर्णिमा गुरूवासरे || २ ||

सदा स्मित हास्य, भाळी भस्म, गळा रूद्राक्ष माळा | 

वात्सल्यमूर्तित्वम् षड्भावशुन्यम् तव पदी नमन हे दीनदयाळा || ३ ||

तव कृपे सद्गुरू मज आत्मबोध झाला - सदगुरू - २ ||

मागणे हेची तव पदी आता सदगुरू रायपाटण क्षेत्री घडो दत्तसेवा || ४ ||

काकडा ओवाळीता, तव सुत म्हणे जगन्नाथा सद्गुरू दत्तदासा | 

चैतन्य स्वरूपम् सद्गुरू रूपम् मजकडूनी तव घडो नित्य सेवा || ५ ||

तव महिमा म्यां पामरा कैसा वर्णांवा, सद्गुरू नाही मज ठावा | 

परम भक्तिभावे, केला काकडा मी सद्गुरू पावन करूनी घ्यावा || ६ ||

(सद्गुरू दत्तदास दहिवलीकर महाराज देवता अर्पणमस्तु| )

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

- २ -

काकड आरती करितो दत्तदास देवा | सद्गुरू जगन्नाथ देवा |

निर्गुण रूप दाऊनी घ्यावी बालक नित्य सेवा || धृ ||

होम हवने बीज मंत्र जप करूनी काकडा केला |

सद्गुरू काकडा केला भाव भक्तिचे तूप घालूनी तो मी पेटविला || १ ||

कळंब क्षेत्री देह ठेवूनी दत्त रूपी झाला | सद्गुरू दत्त रूपी झाला | 

श्रद्धेचा तो धूप घालूनी मी तुज आळविला || २ ||

रूद्राचा अभिषेक करूनी तुजला आरती ओवाळू | सद्गुरू आरती ओवाळू ||

रायपाटण क्षेत्री फुले उधळुनी तुजला न्याहाळू || ३ ||

काम, क्रोध, मद, मोह, मत्सर मम जाळूनी टाकावा | सद्गुरू जाळूनी टाकावा ||

महादेव म्हणे मस्तक ठेवूनी करितो तव नमन मी पाया || ४ ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

काकड आरती

उठा उठा सकळ जन | घ्या आपुले हीत साधुन, नरदेह सांडूनी जाता |

मग कैसा भगवंत || धृ |उठा उठा भल्या पहाटेसी | चला जाऊ दत्त दर्शनासी 

जळतील पातकांच्या राशी | काकड आरती ऐकुनिया, उठूनि पहाटेच्या वेळी |

दत्त पहा निज मंदिरी चरण पहा न्याहाळूनि | अमृत दृष्टी लाऊनिया || १ ||

जागे करूया प्रभूराया | उठा उठा हो दत्तराया | उठा उठा हो दत्तराया |

निंबलोन करा वेगे | दृष्ट न लागो प्रभुशी || पुढे वाजवा चौघडा |

नगारा वाजे धडाडधडा | आरती करा धरा काकडा | माझ्या दत्त रायाची |

आरतीचा नाद घुमुद्या | सुगंधी धूप उधळास गेर होई महाद्वारा | दत्त दिगंबरा दिगंबरा || २ ||

---------- २ ----------

भक्ति भावे ओवाळू काकड ज्योती पंच प्राण अर्पु ओवाळू आरती || धृ ||

ओवाळितो आरती माझ्या दत्तराया | दोन्ही कर जोडूनी मस्तक ठेवितो पाया |

किती महिमा वर्णू न वर्णावे किती | ब्रह्मदत्यासम पापेही जळती || २ ||

धेनु मागे स्वान दोन्ही बाही | शंख डमरू त्रिशूळ शोभे ठायीं || ३ |

पाद्यपूजा करिता आरती ओवाळू तेज न्याहाळू || ४ |

काकड ओवाळीता जगन्नाथ म्हणे | दिगंबर दिगंबर स्फूरले हे गाणे || ५ ||