दत्त जन्मोत्सव 2023

 श्री दत्त जयंती उत्सव

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र रायपाटण येथील दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरात मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी दिवशी म्हणजेच सोमवारी दि. २५ डिसेंबर, 2023 रोजी दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. दत्त जन्मोत्सवाबरोबरच यावर्षी मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी या दुग्धशर्करासमान समारोहामध्ये सहभागी व्हावे.


सोमवार, २५ डिसेंबर (दत्त जयंती)

सायंकाळी ५.५५ वाजता : दत्त जन्मोत्सव 

सायंकाळी ६.३० वाजता : दत्त पालखी सोहळा

रात्री ९.०० वाजता : महाप्रसाद


मंगळवार, २६ डिसेंबर (मार्गशीर्ष पौर्णिमा)

सकाळी ७.०० : देवतांवर अभिषेक व पूजा

सकाळी ९.०० वाजता : नवीन संकल्प व संकल्प अभिषेक

सकाळी १०.०० वाजता : होमहवन



अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥


श्री क्षेत्र रायपाटण येथे बाळगोपाळ मेळावा - 2022 उत्साहात संपन्न

 दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाळगोपाळ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बाळगोपाळ मेळाव्यात शालान्त परीक्षेत व इतर शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच 'पढेगा भारत, बढेगा भारत' या केंद्र सरकारच्या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांना मंदिरातर्फे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास तालुक्यातील विद्यार्थी-पालक, शिक्षक, तसेच तालुक्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.