श्री क्षेत्र रायपाटण रजि.क्र.अे.१०९४(रत्नागिरी)
दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरातील काकड आरती
दत्तदास दत्तमंदिर
श्री क्षेत्र रायपाटण दत्तदास दहिवलीकर महाराजांची काकड आरती
(वेळ पहाटे ५.०० वाजता)
- १ -
दहिवलीकर महाराजउठा उठा हो दत्तदास देवा, सदगुरू जगन्नाथ देवा |
भक्ति भावे करितो काकडा, मजवर कृपादृष्टि ठेवा || धृ ||
सदगुरू - २ बहुजनांचे दु:ख निवारूनी तव, नित्य भाविकांसी उद्धारिले |
कळंब ग्रामी जन्म घेऊनी तया, सद्गुरू समाधिस्त झाले || १ ||
तव समाधि दर्शनमात्रे, सदगुरू भव दु:ख हारे |
विशेष महिमा सदगुरू तव दर्शना, पौर्णिमा गुरूवासरे || २ ||
सदा स्मित हास्य, भाळी भस्म, गळा रूद्राक्ष माळा |
वात्सल्यमूर्तित्वम् षड्भावशुन्यम् तव पदी नमन हे दीनदयाळा || ३ ||
तव कृपे सद्गुरू मज आत्मबोध झाला - सदगुरू - २ ||
मागणे हेची तव पदी आता सदगुरू रायपाटण क्षेत्री घडो दत्तसेवा || ४ ||
काकडा ओवाळीता, तव सुत म्हणे जगन्नाथा सद्गुरू दत्तदासा |
चैतन्य स्वरूपम् सद्गुरू रूपम् मजकडूनी तव घडो नित्य सेवा || ५ ||
तव महिमा म्यां पामरा कैसा वर्णांवा, सद्गुरू नाही मज ठावा |
परम भक्तिभावे, केला काकडा मी सद्गुरू पावन करूनी घ्यावा || ६ ||
(सद्गुरू दत्तदास दहिवलीकर महाराज देवता अर्पणमस्तु| )
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
- २ -
काकड आरती करितो दत्तदास देवा | सद्गुरू जगन्नाथ देवा |
निर्गुण रूप दाऊनी घ्यावी बालक नित्य सेवा || धृ ||
होम हवने बीज मंत्र जप करूनी काकडा केला |
सद्गुरू काकडा केला भाव भक्तिचे तूप घालूनी तो मी पेटविला || १ ||
कळंब क्षेत्री देह ठेवूनी दत्त रूपी झाला | सद्गुरू दत्त रूपी झाला |
श्रद्धेचा तो धूप घालूनी मी तुज आळविला || २ ||
रूद्राचा अभिषेक करूनी तुजला आरती ओवाळू | सद्गुरू आरती ओवाळू ||
रायपाटण क्षेत्री फुले उधळुनी तुजला न्याहाळू || ३ ||
काम, क्रोध, मद, मोह, मत्सर मम जाळूनी टाकावा | सद्गुरू जाळूनी टाकावा ||
महादेव म्हणे मस्तक ठेवूनी करितो तव नमन मी पाया || ४ ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
काकड आरती
उठा उठा सकळ जन | घ्या आपुले हीत साधुन, नरदेह सांडूनी जाता ||
मग कैसा भगवंत || धृ || उठा उठा भल्या पहाटेसी | चला जाऊ दत्त दर्शनासी |
जळतील पातकांच्या राशी | काकड आरती ऐकुनिया, उठूनि पहाटेच्या वेळी |
दत्त पहा निज मंदिरी चरण पहा न्याहाळूनि | अमृत दृष्टी लाऊनिया || १ ||
जागे करूया प्रभूराया | उठा उठा हो दत्तराया | उठा उठा हो दत्तराया |
निंबलोन करा वेगे | दृष्ट न लागो प्रभुशी || पुढे वाजवा चौघडा |
नगारा वाजे धडाडधडा | आरती करा धरा काकडा | माझ्या दत्त रायाची |
आरतीचा नाद घुमुद्या | सुगंधी धूप उधळास गेर होई महाद्वारा | दत्त दिगंबरा दिगंबरा || २ ||
---------- २ ----------
भक्ति भावे ओवाळू काकड ज्योती पंच प्राण अर्पु ओवाळू आरती || धृ ||
ओवाळितो आरती माझ्या दत्तराया | दोन्ही कर जोडूनी मस्तक ठेवितो पाया |
किती महिमा वर्णू न वर्णावे किती | ब्रह्मदत्यासम पापेही जळती || २ ||
धेनु मागे स्वान दोन्ही बाही | शंख डमरू त्रिशूळ शोभे ठायीं || ३ ||
पाद्यपूजा करिता आरती ओवाळू तेज न्याहाळू || ४ ||
काकड ओवाळीता जगन्नाथ म्हणे | दिगंबर दिगंबर स्फूरले हे गाणे || ५ ||
जनकल्याणप्रीत्यर्थ उपक्रम
मंदिरात होणारे मुख्य कार्यक्रम
- पंचायतन यज्ञ याग
- व्यास पौर्णिमा (गुरू पौर्णिमा)
- श्री कृष्ण जयंती
- श्रावणी सोमरा (दुसरा) अभिषेक
- नवरात्र उत्सव (नवदूर्गा)
- दत्त जयंती उत्सव सोहळा (पालखी प्रदक्षिणा)
- यात्रा (पौष महिना, कृष्ण पक्ष)
- माघी गणेश जन्म
- हरिनाम यज्ञ सप्ताह (पारायण, कीर्तन, भजन)
- महाशिवरात्री (अभिषेक)
- या व्यतिरिक्त दर पौर्णिमा व गुरूवारी संकल्प होतात.
- दत्तदासांचे दास दत्त मंदिर श्री क्षेत्र रायपाटण देवस्थानात चांगल्या प्रकारची पूजाअर्चा आणि विविध धार्मिक, सामाजिक उत्सव साजरे करणे. त्यायोगे समाजाचे ऐक्य साधून समाजशक्ती विधायक कार्याला लावणे.
- विविध वयोगटातील व्यक्तींसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, आरोग्य शिबिर, छंदवर्ग, क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करणे.
- अपंग व दुर्बल व्यक्तींना सर्वतोपरी साहाय्य करणे.
- नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्तींच्यावेळी आपदग्रस्तांना मदत करणे.
- गुरूपौर्णिमा, देवतांचे जन्मोत्सव इत्यादी परंपरागत धार्मिक उत्सव साजरे करणे तसेच प्रवचन, कीर्तन, पारायण, भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मार्गदर्शन करणे.
- विविध कार्यक्रमांद्वारे जनप्रबोधन करणे, हुुंडाबळी, नशाबंदी, दारूबंदी आणि कुटुंब नियोजन यांसारख्या शासकीय कार्यक्रमांस प्रोत्साहन देणे.
- शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे आणि गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे.
- व्याधिग्रस्त, निराधार, घटस्फोटिता, अनाथ बालके इत्यादींच्या मदतीसाठी आणि शुश्रृषेसाठी अनाथश्रम, वृद्धाश्रम व आधाराश्रम उभारणे.
- सामुदायिक विवाह घडवून आणणे आणि कौटुंबिक समुपदेशन करणे.
प्रिय भक्तगण
भगवंताने दर्शविलेल्या दहा (मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की) अवतारांचा विचार करीता चालू काळ हा कलियुगाचा आहे. या कलियुगात धर्मावरील श्रद्धा उडत चालली आहे. स्वत:ला नास्तिक समजणारी व्यक्तीही मंदिरातील मूर्तीकडे पाहून प्रसन्न होते आणि मनातल्या मनांत नकळत का होईना विनम्र होतेच.
श्री भगवंत हेच सद्गुरू आहेत. श्री सद्गुरू हे कधीच शिष्य करीत नाहीत तर ते सद्गुरू तयार करीत असतात. शिष्याचे शरीर हे सद्गुरूसाठी ईश्वराचे मंदिर आहे. सद्गुरूंनी दिलेले नाम हे केवळ नाम अक्षर किंवा शब्द नाही. या नामामध्ये या शक्तीचा संचार हीच सद्गुरूंची दिक्षा आहे.
ईश्वराची शक्ती सर्वांमध्ये आहे. शिष्याच्या शक्तीला जागृत करण्याला शक्ती संचार असे म्हणतात. ही शक्ती निद्रावस्थेत असते. जे लोक श्वास प्रश्वासावर नामजप करत तिला पुन्हा झोपू देत नाहीत. त्या व्यक्तीमध्ये ती शक्ती विशेष करून कार्य करीत असते.
वृक्षाप्रमाणे सहनशील व्हावे. धन सन्मान इत्यादी गुणांनी श्रेष्ठ राहूनही या सर्वांचा गर्व करू नये. आपल्या अभिमानाचा त्याग करून नामजप केल्याने फळ प्राप्त होते. यासाठी धर्मग्रंथाचे वाचन, गुरू आज्ञेचे पालन आणि माता पिता गुरूजन यांची सेवा आवश्यक आहे.
आहाराशी धर्माचा संबंध आहे. शरीर आणि आत्मा एकत्रच राहतात. हा आहार योग्य रूपात केला नाही तर धर्म नष्ट होतो. प्रत्येक घासाला नामजप केला पाहिजे. भोजनाचे प्रमाण आणि वेळ योग्य ठेवल्यास शरीराबाबत कोणताही त्रास राहत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी सकाळी, उठण्याच्यावेळी साधन, भजन करण्याच्या आधी आणि ते झाल्यावर खाली दिलेल्या मंत्राचे स्मरण करीत नमस्कार करावा. ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ||
सत्ययुगात ध्यान आणि यज्ञ हाच धर्म आहे. तर त्रेतायुगात ज्ञान आणि यज्ञ व धर्म सांगितला आहे. द्वापारयुगातला धर्म देवता आणि संत महात्मे यांच्याशी परिचर्या आणि त्याची पूजा आहे. तर कलियुगात फक्त नामजप आणि दान हाच धर्म सांगितला आहे.
गाईला जर दुसरीकडे न्यावयाचे असेल तर गुराखी तिच्या वासराला घेऊन पुढे चालतो, जेणेकरून गाय इकडे तिकडे न पाहता वासराच्या मागे चालू लागते. त्याचप्रमाणे परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या चरणांचा आश्रय घेतलेल्या भगवद् भक्तांना शरण जा. अशा तऱ्हेने जो भगवद् भक्तांचा आश्रय घेऊन आत्मसमर्पण करतो. त्याच्याविषयी परमेश्वर नेहमीच काळजी घेतो.
कलियुगात फक्त नाप जप आणि दानधर्म हाय सांगितला आहे. आहार निद्रा, भय आणि मैथून यांचा संयम पाळणे आवश्यक आहे. धन किंवा पैसा कितीही मिळाला तरी मनाची कधीही तृप्ती ाव आहे.होत नाही. असा मनाचा स्वभावच आहे. कनक आणि कांता या दोनच गोष्टी सर्व अनिष्ठांचे मूळ आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी श्रद्धा असणे आवश्यक आहे. ती जर नसेल तर कुणाचे घरदार, कुणाच्या गायी-म्हशी? जरी राम नाम न घेशी | आत्मा जाईल उपाशी || अशाप्रमाणे होईल. त्यातून बाहेर पडण्यासाठी अखंड नाम जप, साधना श्वास प्रश्वासावर करत राहणे, आवश्यक आहे. त्यानेच आपल्याला सर्व काही प्राप्त होईल.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात श्री क्षेत्र रायपाटण इथल्या दत्त मंदिरात आजपर्यंत हजारो लोक व्यसनमुक्त झाले आहेत. पिशाच्चबाधा, जादू-टोना, संतती दोष, इतर दोष, व्यापारातील अडचणी, गृह दोष इत्यादी सर्व प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेले लोक सद्गुरू आशीवार्दाने सखी झााले आहेत.
तुम्हा सर्वांची परमेश्वर उत्तरोत्तर भरभराट करून त्यांना आयु-आरोग्य प्राप्त होवो, ही दत्त चरणी प्राथर्ना!
दत्तदासांचे दीनदास स्वामी महादेवानंदजी बांबरकर
दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटण

