।। पंचायतन सद्गुरू दत्तवारी।।

 ।। गणेशदत्त सरस्वत्यै सद्गुरू शरणं मम:।।

पंचायतन सद्गुरू दत्तवारी

दत्तचिया भक्ता नाही भयचिंता।

विश्वंभरा तू केशवा आदी नमो गणराया ।।

शु्द्ध व्हावया अंत:करण करावे गा तिर्थागमन।

तिर्थयात्रा श्रद्धा गहन तिर्थाटन या नाव।।

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

चैतन्य श्री सद्गुरू दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने,


आपणा सर्वांना विनम्र अभिवादन,

ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण आणि तो दिवस सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आला आहे. तो म्हणजे आपल्या सर्वांची सद्गुरूंची दत्तवारी (पंचायतन). सालाबादप्रमाणे, मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी मंगळवार दिनांक १४ डिसेंबर, २०२१ पासून ते मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी शनिवार १८ डिसेंबर, २०२१ पर्यंत वारीचे नियोजन करण्यात आले. यात दुग्धशर्करा योग म्हणजे श्री क्षेत्र रायपाटण, बांबरकरवाडीतील दत्त मंदिरात साजरा होणारा 'दत्तजन्मोत्सव'  सोहळा वारकरी बंधू-भगिनींना पाहयला मिळणार आहे.

वारी परंपरेचा पाया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत श्री एकनाथ महाराज यांनी रचला. मानवी जीवाला सततच्या दु:खी-कष्टी जीवनातून आनंद मिळावा यासाठी दत्तदासांचे दास दहिवलीकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्वामी महादेवानंदजी महाराज यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथील कल्लेश्वर मंदिरात दत्तवारीचा संकल्प सोडला होता. जनकल्याणासाठी, भाविकांचे दु:ख-दारिद्रय, वैयक्तिक-कौटुंबिक अडचणी, व्यसनमुक्ती आदी सर्व व्याधी दूर व्हाव्यात. यासाठी सद्गुरूंनी नवरात्री उत्सवाच्या काळात १४ वर्षे अनुष्ठानं केली तसेच श्री क्षेत्र गाणगापूर येथील संगम स्थानावर गुरूचरित्र पारायण स्वरूपात साक्षात दत्त महाराजांची तपश्चर्या केली.

यंदा आपल्या सद्गुरू दत्तवारीची सुरूवात पांडुरंगाच्या एकादशी दिवशी होऊन ती दत्तजन्मोत्सवाच्या दिवसाला सांगता होणार आहे. आपण सर्व भक्तगण आणि शिष्य परिवार खूप भाग्यवान आहोत. आपण सर्वांना दत्त-नवरात्रीतील पाच दिवस सद्गुरूंचे नामस्मरण करण्यासाठी मिळाले आहेत. या संधीतून आपल्याला कुटुंबासाठी दत्तमहाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर आपआपल्या गाडीप्रमुखाकडे नावे नोंदवावीत.

कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता वारी दरम्यान आपल्याला स्वत:ची आणि आपल्या सहकाऱ्यांची-कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे. हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. यातून आपलेच संरक्षण होणार आहे. 

पंचायतन सद्गुरू दत्तवारीतील तीर्थस्थळे : श्री क्षेत्र रायपाटण (ता. राजापूर, जि. रत्नागिरी)

                                                                    श्री क्षेत्र तुळजापूर (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद)

                                                                    श्री क्षेत्र अक्कलकोट (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर)

                                                                    श्री क्षेत्र गाणगापूर (ता. अफझलपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक)

                                                                    श्री क्षेत्र पंढरपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)

                                                                    श्री क्षेत्र कुरूंदवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली)

सद्गुरू दत्तवारीतील सर्व भाविकांची पाच दिवस राहण्याची, चहा-नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. जिथे शक्य होईल त्या तीर्थक्षेत्राच्या स्थळी मंदिराच्यावतीने दिला जाणारा आशीर्वादरूपी महाप्रसाद घेतला जाईल.

श्री क्षेत्र रायपाटण (दत्तमंदिर) येथून वारीत सहभागी होण्याचा प्रवास खर्च प्रति व्यक्ती रूपये ४०००/-

मुंबईतून वारीत सहभागी होण्याचा प्रवास खर्च प्रति व्यक्ती रूपये ४५००/- 

वारीत सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक श्री. जयेश बांबरकर :  +91 79778 67076

श्री क्षेत्र रायपाटण दत्त मंदिर गाडीप्रमुख - 

                                                               श्री. वसंत कोळवणकर : +91 94029 07997

                                                               श्री. गुरूप्रसाद ताम्हणकर : +91 94220 70772

                                                               श्री. अनंत सावंत : +91 92257 2778

                                                               श्री. दत्ताराम पवार : +91 84128 42804

कल्याण विभाग गाडीप्रमुख -

                                                               श्री. श्रीधर बांबरकर : +91 83559 85241

                                                               श्री. चंद्रकांत साठे : +91 94226 84113

                                                               श्री. महादेव शेटे : +91 99699 79071

                                                               श्री. सुनील कडू : +91 90824 96896

कांदिवली विभाग गाडीप्रमुख -

                                                               श्री. विजय बांबरकर : +91 98920 95609  

                                                               श्री. विनय वस्त : +91 98920 91858

                                                               श्री. सचिन झगडे : +91 97301 59234

                                                               श्री. प्रकाश बांबरकर : +91 90291 69842

......................................................................................................................................................................

सूचना ;

१. दत्तवारील येताना भाविकांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. 

२. आरोग्याच्या दृष्टीने स्वत:ची औषधे, अंथरूण-पांघरूण, जेवणासाठी ताट-वाटी-ग्लास स्वत: आणावे. 

३. प्रवासादरम्यान मास्क वापर बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा.

४. भाविकांनी आपल्यासोबत शक्यतो मौल्यवान वस्तू (महागडे मोबाईल, घड्याळे, दागिने आदी) आणू नयेत. आणल्यास त्याची जबाबदारी स्वत:वरच असेल.

                                                                                                                    आपले नम्र,

                                                                                                  सद्गुरू दत्तवारी (श्री क्षेत्र रायपाटण)

                                                                                                        दत्तदास सद्गुरू सेवा मंडळ


चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज पादुका स्थापना

श्रीगुरू म्हणती नका करू दु:ख आम्ही असो याचिग्रामी ।।

मठी आमुच्या ठेवितो पादुका त्या पुरवतील मनोकामना ।।


चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज समाधी मंदिरातील पादुका स्थान.

चैतन्य सद्गुरू दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुद्वादशी- दिपावली धनत्रयोदशी (दि. २ नोव्हेंबर, २०२१) या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज समाधी मंदिरात स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. तसेच महाराजांच्या इच्छेनुसार दत्त महाराजांच्या गाभाऱ्यात श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती व चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुका.

या दोन भव्यदिव्य सोहळ्यानिमित्त बांबरकरवाडीतील दत्त मंदिरात १ आणि २ नोव्हेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.०० वाजता काकड आरतीपासून या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर रूद्र अभिषेक, गुरू पादुका आणि श्री नृसिंह सरस्वती मूर्ती पूजन विधी, समाराधना, शटप्रणम मृत्युंजय हवन पूर्णाहुती, आरती, भजन, हरिपाठ व महाप्रसाद आदी कार्यक्रम करण्यात आले. दरम्यान ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या पादुकांची ग्रामदेवता वडचाई मातेच्या मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्री क्षेत्र संगोबानाथ शिव मंदिराला लागून असलेल्या अर्जुना नदीचे पाणी महाराजांच्या पादुकावर जलाभिषेक करण्यासाठी आणले होते. या सोहळ्याद्वारे सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पंचक्रोशीतील शिष्य परिवार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती आणि चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुकांचे विधिवत शिष्य परिवरांच्या उपस्थित पूजन करताना.



दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर

आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना जयेशानंदजी बांबरकर महाराज. सोबत रेवण सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती रविशंकर शिवाचार्य महाराज.

2 नोव्हेंबर, 2021 :  श्री क्षेत्र रायपाटण इथे दत्तभक्तीची पताका रोवत गेली ३० वर्षाहून अधिक वर्षे अध्यात्मिक व सामाजिक कार्यासोबतच व्यसनमुक्तीचे कार्य करणारे दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुद्वादशी (दि. 2 नोव्हेंबर) दिपावली धनत्रयोदशीच्या अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांसाठी व सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन जयेशानंदजी बांबरकर महाराज यांच्या हस्ते आणि रेवण सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती रविशंकर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी रायपाटण उपजिल्हा रूग्णालयाचे सुप्रिटेंडंट डॉ. विकास शर्मा, जीवनदाता संस्थेचे अध्यक्ष राजेश नार्वेकर तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे, तसेच रायपाटण उपजिल्हा रूग्णालयाचे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, शिष्य परिवार, भाविक वर्ग उपस्थित होता.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य व रक्तदान शिबिरासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालय, जीवनदान ग्रुप, इन्फिगो आयकेअर सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी शिबिरात 70 हून अधिक नागरिकांनी आरोग्य व डोळे तपासणी करून घेतली. तर 25 हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरार्थींंना शुभेच्छा देताना. 

मंदिराच्यावतीने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह स्वीकारताना.

शिबिरास उपस्थित शिबिरार्थी.

शारदीय नवरात्र उत्सवात देवीची ९ दिवसातील मनमोहक रूपं!

 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।












श्री क्षेत्र रायपाटण येथील दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरात दि. ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोना संसर्गाच्या विळख्यातून आपण हळूहळू बाहेर येत आहोत. महाराष्ट्र शासनानेही नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्व मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली होती. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. आपल्या सर्वांवर आलेली संकट दूर होवो, अशी प्रार्थना आई अंबामातेच्या चरणी करूया.

|| आंबे माते की जय ||

रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा - २०२१

 दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटणता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी नव्याने पुन्हा एकदा लिंक ओपन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत अव्वल यश मिळवावे.

 

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर पहिला मराठी व गणित - https://forms.gle/1mwwncdPqArDKdAM8

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इंग्रजी व बुद्धिमत्ता - https://forms.gle/X9TjK1anAd1SXjvv5

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर पहिला मराठी व गणित - https://forms.gle/DVXDcqqWvPbvkMXv9

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इंग्रजी व बुद्धिमत्ता - https://forms.gle/FKA5vnTUPM5WAcLz8

 

सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

 

|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||

ऑनलाईन शिष्यवृत्ती सराव परीक्षा - २०२१ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी 

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात अखंड हरिनाम सप्ताह, यज्ञ सप्ताह, दत्त जयंती, विश्वशांती यज्ञ यासोबतच बालगोपाळ मेळावा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, चित्रकला-अभंग गायन स्पर्था आदींचे ही आयोजन केले जाते. तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा. यासाठी कित्येक वर्षापासून मंदिराच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन केले जाते. यास शिक्षण विभागाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.  यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गुगल फॉर्मद्वारे ही सराव परीक्षा प्रथमच Online घेण्यात आली. आपल्या महाराजांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे या सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ऑनलाईन परीक्षेत २००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांनी सुरू केलेला हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ सुवर्णकाळ ठरवणारा आहे.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरातील काकड आरती

दत्तदास दत्तमंदिर

श्री क्षेत्र रायपाटण दत्तदास दहिवलीकर महाराजांची काकड आरती

(वेळ पहाटे ५.०० वाजता)

-  १ -

दहिवलीकर महाराज

उठा उठा हो दत्तदास देवा, सदगुरू जगन्नाथ देवा |

भक्ति भावे करितो काकडा, मजवर कृपादृष्टि ठेवा || धृ ||

सदगुरू - २ बहुजनांचे दु:ख निवारूनी तव, नित्य भाविकांसी उद्धारिले | 

कळंब ग्रामी जन्म घेऊनी तया, सद्गुरू समाधिस्त झाले || १ ||

तव समाधि दर्शनमात्रे, सदगुरू भव दु:ख हारे | 

विशेष महिमा सदगुरू तव दर्शना, पौर्णिमा गुरूवासरे || २ ||

सदा स्मित हास्य, भाळी भस्म, गळा रूद्राक्ष माळा | 

वात्सल्यमूर्तित्वम् षड्भावशुन्यम् तव पदी नमन हे दीनदयाळा || ३ ||

तव कृपे सद्गुरू मज आत्मबोध झाला - सदगुरू - २ ||

मागणे हेची तव पदी आता सदगुरू रायपाटण क्षेत्री घडो दत्तसेवा || ४ ||

काकडा ओवाळीता, तव सुत म्हणे जगन्नाथा सद्गुरू दत्तदासा | 

चैतन्य स्वरूपम् सद्गुरू रूपम् मजकडूनी तव घडो नित्य सेवा || ५ ||

तव महिमा म्यां पामरा कैसा वर्णांवा, सद्गुरू नाही मज ठावा | 

परम भक्तिभावे, केला काकडा मी सद्गुरू पावन करूनी घ्यावा || ६ ||

(सद्गुरू दत्तदास दहिवलीकर महाराज देवता अर्पणमस्तु| )

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

- २ -

काकड आरती करितो दत्तदास देवा | सद्गुरू जगन्नाथ देवा |

निर्गुण रूप दाऊनी घ्यावी बालक नित्य सेवा || धृ ||

होम हवने बीज मंत्र जप करूनी काकडा केला |

सद्गुरू काकडा केला भाव भक्तिचे तूप घालूनी तो मी पेटविला || १ ||

कळंब क्षेत्री देह ठेवूनी दत्त रूपी झाला | सद्गुरू दत्त रूपी झाला | 

श्रद्धेचा तो धूप घालूनी मी तुज आळविला || २ ||

रूद्राचा अभिषेक करूनी तुजला आरती ओवाळू | सद्गुरू आरती ओवाळू ||

रायपाटण क्षेत्री फुले उधळुनी तुजला न्याहाळू || ३ ||

काम, क्रोध, मद, मोह, मत्सर मम जाळूनी टाकावा | सद्गुरू जाळूनी टाकावा ||

महादेव म्हणे मस्तक ठेवूनी करितो तव नमन मी पाया || ४ ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

काकड आरती

उठा उठा सकळ जन | घ्या आपुले हीत साधुन, नरदेह सांडूनी जाता |

मग कैसा भगवंत || धृ |उठा उठा भल्या पहाटेसी | चला जाऊ दत्त दर्शनासी 

जळतील पातकांच्या राशी | काकड आरती ऐकुनिया, उठूनि पहाटेच्या वेळी |

दत्त पहा निज मंदिरी चरण पहा न्याहाळूनि | अमृत दृष्टी लाऊनिया || १ ||

जागे करूया प्रभूराया | उठा उठा हो दत्तराया | उठा उठा हो दत्तराया |

निंबलोन करा वेगे | दृष्ट न लागो प्रभुशी || पुढे वाजवा चौघडा |

नगारा वाजे धडाडधडा | आरती करा धरा काकडा | माझ्या दत्त रायाची |

आरतीचा नाद घुमुद्या | सुगंधी धूप उधळास गेर होई महाद्वारा | दत्त दिगंबरा दिगंबरा || २ ||

---------- २ ----------

भक्ति भावे ओवाळू काकड ज्योती पंच प्राण अर्पु ओवाळू आरती || धृ ||

ओवाळितो आरती माझ्या दत्तराया | दोन्ही कर जोडूनी मस्तक ठेवितो पाया |

किती महिमा वर्णू न वर्णावे किती | ब्रह्मदत्यासम पापेही जळती || २ ||

धेनु मागे स्वान दोन्ही बाही | शंख डमरू त्रिशूळ शोभे ठायीं || ३ |

पाद्यपूजा करिता आरती ओवाळू तेज न्याहाळू || ४ |

काकड ओवाळीता जगन्नाथ म्हणे | दिगंबर दिगंबर स्फूरले हे गाणे || ५ ||

जनकल्याणप्रीत्यर्थ उपक्रम

मंदिरात होणारे मुख्य कार्यक्रम

  • पंचायतन यज्ञ याग
  • व्यास पौर्णिमा (गुरू पौर्णिमा)
  • श्री कृष्ण जयंती
  • श्रावणी सोमरा (दुसरा) अभिषेक
  • नवरात्र उत्सव (नवदूर्गा)
  • दत्त जयंती उत्सव सोहळा (पालखी प्रदक्षिणा)
  • यात्रा (पौष महिना, कृष्ण पक्ष)
  • माघी गणेश जन्म
  • हरिनाम यज्ञ सप्ताह (पारायण, कीर्तन, भजन)
  • महाशिवरात्री (अभिषेक)
  • या व्यतिरिक्त दर पौर्णिमा व गुरूवारी संकल्प होतात.
परमपूज्य दत्तदास दहिवलीकर महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन त्यांनीच दिलेल्या प्रेरणेनुसार गोरगरिबांना पैशाअभावी गाणगापूर येथे जाता येत नाही. त्यामुळे दत्त महाराजांच्या सेवेचा लाभ घेता येत नाही. सध्याच्या युवा पिढीला भगवंताचे नामस्मरण म्हणजे काय याची कल्पना व महत्त्वही माहित नाही. पूजापाठ, नामस्मरण, चिंतन, मनन, वाचन ह्या गोष्टींपासून आजची पिढी फारच दूर आहे. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना अनेक प्रकारचे धोके पत्करावे लागत आहेत. टीव्हीवरील पाश्चात्य कार्यक्रमांतील भोगी जीवन मार्ग म्हणजे जीवनाचा उपभोग घेण्याचा सोपा मार्ग अशा चुकीच्या समजुतीने ते त्यात मनसोक्त रंगून व्यसनांच्या अधील झाले आहेत. त्यामुळे अनेक व्याधी व भूत पिशाच्च बाधेचा त्रासही त्यांना करावा लागत आहे. संतती प्राप्तीसाठी अनेकजण चुकीच्या मार्गाने अनुकरण करीत आहेत. त्यामुळे ते जीवनात अयशस्वी झाले आहेत. सर्वांचा मनोमन विचार करून यातून त्यांना मुक्त होण्यासठी जगद्गुरू श्री दत्तात्रेयांच्या दत्तपादुकांची जनकल्याणप्रीत्यर्थ औदुंबराखाली प्रतिष्ठापना केली आहे.
आज त्याचा विस्तार एवढा झाला आहे की ते इवलेसे रोप ज्या दारी लावले त्या रोपाची वेल जनकल्याणासाठी गगनाला जाऊन त्याचा भव्य मंडप तयार झाला आहे. आज त्याच मंडपामध्ये विश्वशांतीसाठी आतापर्यंत 29 अखंड हरिनाम सप्ताह होऊन गेले आहेत. दिवसेंदिवस या कार्याची व्याप्ती वाढून व्यसन मुक्ती, भूत-पिशाच्च बाधा -निवारण, संतती प्राप्ती या गोष्टी दत्तात्रेयांच्या शक्तीने आणि सद्गुरूंच्या आशीवार्दाने निवारण होत आहे.

याच श्रद्धेतून विश्वस्त मंडळाने अनेक विधायक उपक्रमांचा संकल्प सोडला आहे.
  1. दत्तदासांचे दास दत्त मंदिर श्री क्षेत्र रायपाटण देवस्थानात चांगल्या प्रकारची पूजाअर्चा आणि विविध धार्मिक, सामाजिक उत्सव साजरे करणे. त्यायोगे समाजाचे ऐक्य साधून समाजशक्ती विधायक कार्याला लावणे.
  2. विविध वयोगटातील व्यक्तींसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, आरोग्य शिबिर, छंदवर्ग, क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करणे.
  3. अपंग व दुर्बल व्यक्तींना सर्वतोपरी साहाय्य करणे.
  4. नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्तींच्यावेळी आपदग्रस्तांना मदत करणे.
  5. गुरूपौर्णिमा, देवतांचे जन्मोत्सव इत्यादी परंपरागत धार्मिक उत्सव साजरे करणे तसेच प्रवचन, कीर्तन, पारायण, भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मार्गदर्शन करणे.
  6. विविध कार्यक्रमांद्वारे जनप्रबोधन करणे, हुुंडाबळी, नशाबंदी, दारूबंदी आणि कुटुंब नियोजन यांसारख्या शासकीय कार्यक्रमांस प्रोत्साहन देणे.
  7. शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे आणि गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे.
  8. व्याधिग्रस्त, निराधार, घटस्फोटिता, अनाथ बालके इत्यादींच्या मदतीसाठी आणि शुश्रृषेसाठी अनाथश्रम, वृद्धाश्रम व आधाराश्रम उभारणे.
  9. सामुदायिक विवाह घडवून आणणे आणि कौटुंबिक समुपदेशन करणे.

विश्वस्त मंडळातर्फे राबविण्यात येणारे काही महत्त्वाचे उपक्रम

आरोग्य शिबिर : दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर आणि सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन भायखळा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर मंदिराचे विश्वस्त आणि हृदयशल्य विशारद डॉ. रवींद्र पेंडकर यांच्या पंधरा सहकार्यांच्या उपस्थितीत मोफत हृदयरोग चिकित्सा, नेत्र चिकित्सा, त्वचारोग, बालरोग, मधुमेह, रक्तदाब, दंत चिकित्सा, स्त्रीरोग इत्यादी रोगांवर उपचार करण्यात आले. याचा फायदा सुमारे 1 हजार भाविकांनी-भक्तांनी घेतला. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आखण्याचा विश्वस्तांचा मानस आहे. 

शैक्षणिक अभियान : शासनाच्या परवानगीने इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून मंदिर न्यासातर्फे सराव करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन आणि तयारी करून घेतली जाते. तसेच परीक्षांचे आयोजनही केले जाते. 
श्री दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरीच्या सौजन्याने पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिनांक 24 जानेवारी 2007 रोजी घेण्यात आल्या. राजापूर तालुक्यातील 34 केंद्र शाळांमध्ये एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेतल्या. संपूर्ण तालुक्यातून मराठी माध्यमाचे - माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 1315 व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी 2934 विद्यार्थी परीक्षेला बसले. उर्दू माध्यमाचे 78 + 176 व इंग्रजी माध्यमाचे 14 + 30 मिळून 298 मुलांची सराव परीक्षा घेण्यात आली. त्यातून पूर्व प्राथमिक विभागातून 15 आणि माध्यमिक विभागातून परीक्षेसाठी 15 विद्यार्थी असे मिळून 30 विद्यार्थ्यांचा 30 जानेवारी 2007 रोजी दत्त मंदिर रायपाटण येथे परम पूज्य सद्गुरू बांबरकर महाराज यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.  या सराव परीक्षेतील 70 टक्के मुले महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा मंडळात उत्तीर्ण झाली. 

अध्यात्मिक उपक्रम : दत्तभाविकांना आपल्या स्वत:च्या अडचणी निवारण व्हाव्यात म्हणून यज्ञयाग, गणेशयाग, दत्तयाग, रूद्रयाग, सूर्ययाग आणि नवचंडी यज्ञ हे उपक्रम सामान्य भाविकांना त्याचा लाभ व्हावा म्हणूनच मंदिराच्यावतीने विनामूल्य आयोजित केले जातात. अनेकांना याविषयी चांगल्या अनुभूती आल्या आहेत.

शिव (रूद्र) : सृष्टीची उत्पत्तीच मुळी ॐ मधून झाली आहे हे सर्वमान्य आहे. प्रथम तेज व नंतर ध्वनी हीच परिस्थिती आकाशात वीज चमकते तेव्हा प्रत्यक्ष अनुभवास येते. ॐ मधून जी शक्ती निर्माण झाली तीच शिव शक्ती होय. प्रथम त्यातून जो सूक्ष्म तेज बिंदू उदयास आला तो शिव.

दत्त (त्रिगुणात्मज) : शिवाच्या अंगच्या (उत्पत्ती-स्थिती-प्रलय) अर्थात रज-सत्व-तम ह्या तीन गुणांमधून  मनुष्याकृती देवता उदयास आली. हीच त्रिमूर्ती होय. तिन्ही देवता तीन गुणांची प्रतिके आहेत. दत्तात्रयांना केलेल्या संकल्पाची सांगता शिव लिंगावरच केली जाते. कारण शिव ही मानवी देवता नसून ती स्वयंभू शक्ती आहे. जी निर्गुण-निराकार आहे.

सूर्य (तेजोमय) : सूक्ष्म तेज बिंदूचे विस्तारित रूप. जे जग प्रकाशमय करून अंधकाररूपी अज्ञानाचा नाश करते. पाच पंचमहाभूतांच्या तत्त्वांवर सृष्टीची निर्मिती झाली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पाच तत्त्वे. या जगाचा निर्माता जो परमात्मा शिव त्याने पाचही महाभूतांना कामास जुंपून या जगाची कर्मरहाटी अविरत चालू ठेवली आहे. आपल्या आध्यात्मामध्ये जो गोष्ट आपण वापरात आणतो त्याचा आदर राखला जातो. म्हणूनच पूजा करताना प्रत्येक गोष्ट तांदूळ देऊन नमस्कार व आवाहन केलं जातं. अशाच प्रकारे पंचमहाभूतांची पूजा करून शांतीसाठी आवाहन केलं जातं.

सृष्टीची उत्पत्ती मुळातच सूक्ष्म तेज बिंदूतून झाली आहे. त्यालाच शिवशक्ती म्हटले जाते. त्याकारणाने तेजमय असणाऱ्या देवतेला प्रज्ज्वलीत करून सर्व देवतांना आपल्या पूर्वजरूपी ऋषी मुनींनी सर्व प्रकारची मंत्राद्वारे आहुती द्यायला सुरूवात केली त्यालाच आपण हवन म्हणतो. आम्ही मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात हवनाला महत्त्व देतो. यात हेतुने आम्ही मंदिरात देवतांचे यज्ञ याग करीत असतो.

तेजा पाठोपाठ ध्वनी हीच पुनरावृत्ती आपल्या देव पूजेत पाहायला मिळते. प्रथम समया लावल्या जातात व नंतर मंत्रोच्चार द्वारे पूजेला सुरूवात होते. ही असते रोजची थोडक्यात करायची पूजा. पण ऋषी मुनींनी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करून काही व्रत-वैकल्ये सुद्धा नेमून दिली आहेत. त्यातलीच एक मोठं सर्वांना एकत्र आणून परमेश्वराचं निरंतर सात दिवस रात्र ईश्वराचं नामस्मरण करून आम्ही मंदिरात साजरा करतो. तो हरिनाम सप्ताह. त्याचा उगम ध्वनी संगीतातून झाला आहे. अशाप्रकारे भजन, अभंग, कीर्तन, वाद्ये, प्रवचनाद्वारे परमेश्वराची भक्ती केली जाते.

दत्तवारी : दत्तवारी प्रत्येक वर्षी साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात 2001 सालापासून सुरू करण्यात आली आहे. दत्तवारीची सुरूवात श्री क्षेत्र रायपाटण आणि मुंबई येथून होते. 2006 सालापासून दत्तवारीला भाविकांकडून चांगला वाढता प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुलुंड, भांडूप, ठाणे, कल्याण आणि कांदिवली ह्या विभागांतून भाविकांसाठी लक्झरी बसची व्यवस्था करण्यात येते. या दत्तवारीत भाविकांची राहण्याची व्यवस्था, चहा, अल्पोपहार आणि जेवण याची सोय मंदिरातर्फे करण्यात येते.