चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज पादुका स्थापना

श्रीगुरू म्हणती नका करू दु:ख आम्ही असो याचिग्रामी ।।

मठी आमुच्या ठेवितो पादुका त्या पुरवतील मनोकामना ।।


चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज समाधी मंदिरातील पादुका स्थान.

चैतन्य सद्गुरू दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुद्वादशी- दिपावली धनत्रयोदशी (दि. २ नोव्हेंबर, २०२१) या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज समाधी मंदिरात स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. तसेच महाराजांच्या इच्छेनुसार दत्त महाराजांच्या गाभाऱ्यात श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती व चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुका.

या दोन भव्यदिव्य सोहळ्यानिमित्त बांबरकरवाडीतील दत्त मंदिरात १ आणि २ नोव्हेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.०० वाजता काकड आरतीपासून या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर रूद्र अभिषेक, गुरू पादुका आणि श्री नृसिंह सरस्वती मूर्ती पूजन विधी, समाराधना, शटप्रणम मृत्युंजय हवन पूर्णाहुती, आरती, भजन, हरिपाठ व महाप्रसाद आदी कार्यक्रम करण्यात आले. दरम्यान ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या पादुकांची ग्रामदेवता वडचाई मातेच्या मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्री क्षेत्र संगोबानाथ शिव मंदिराला लागून असलेल्या अर्जुना नदीचे पाणी महाराजांच्या पादुकावर जलाभिषेक करण्यासाठी आणले होते. या सोहळ्याद्वारे सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पंचक्रोशीतील शिष्य परिवार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती आणि चैतन्य सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या पादुकांचे विधिवत शिष्य परिवरांच्या उपस्थित पूजन करताना.



दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर

आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना जयेशानंदजी बांबरकर महाराज. सोबत रेवण सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती रविशंकर शिवाचार्य महाराज.

2 नोव्हेंबर, 2021 :  श्री क्षेत्र रायपाटण इथे दत्तभक्तीची पताका रोवत गेली ३० वर्षाहून अधिक वर्षे अध्यात्मिक व सामाजिक कार्यासोबतच व्यसनमुक्तीचे कार्य करणारे दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुद्वादशी (दि. 2 नोव्हेंबर) दिपावली धनत्रयोदशीच्या अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांसाठी व सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन जयेशानंदजी बांबरकर महाराज यांच्या हस्ते आणि रेवण सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती रविशंकर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी रायपाटण उपजिल्हा रूग्णालयाचे सुप्रिटेंडंट डॉ. विकास शर्मा, जीवनदाता संस्थेचे अध्यक्ष राजेश नार्वेकर तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे, तसेच रायपाटण उपजिल्हा रूग्णालयाचे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, शिष्य परिवार, भाविक वर्ग उपस्थित होता.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य व रक्तदान शिबिरासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालय, जीवनदान ग्रुप, इन्फिगो आयकेअर सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी शिबिरात 70 हून अधिक नागरिकांनी आरोग्य व डोळे तपासणी करून घेतली. तर 25 हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरार्थींंना शुभेच्छा देताना. 

मंदिराच्यावतीने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह स्वीकारताना.

शिबिरास उपस्थित शिबिरार्थी.

शारदीय नवरात्र उत्सवात देवीची ९ दिवसातील मनमोहक रूपं!

 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।












श्री क्षेत्र रायपाटण येथील दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिरात दि. ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोना संसर्गाच्या विळख्यातून आपण हळूहळू बाहेर येत आहोत. महाराष्ट्र शासनानेही नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्व मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली होती. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. आपल्या सर्वांवर आलेली संकट दूर होवो, अशी प्रार्थना आई अंबामातेच्या चरणी करूया.

|| आंबे माते की जय ||

रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा - २०२१

 दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटणता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी नव्याने पुन्हा एकदा लिंक ओपन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत अव्वल यश मिळवावे.

 

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर पहिला मराठी व गणित - https://forms.gle/1mwwncdPqArDKdAM8

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इंग्रजी व बुद्धिमत्ता - https://forms.gle/X9TjK1anAd1SXjvv5

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर पहिला मराठी व गणित - https://forms.gle/DVXDcqqWvPbvkMXv9

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इंग्रजी व बुद्धिमत्ता - https://forms.gle/FKA5vnTUPM5WAcLz8

 

सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

 

|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||