|| शिष्य भगवंताच्या शक्तीने भगवंताच्या नामस्मरणाशी जोडला गेला, तर तो गुरू होऊ शकतो. ||
|| परमेश्वराच्या आराधनेतून सौख्यप्राप्ती होते आणि नापजप हे त्याचे माध्यम आहे. ||
|| आध्यात्मिक उन्नतीसाठी माणसांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. ||
|| जो मनुष्य जनकल्याणासाठी धडपडतो त्याचे ईश्वर कल्याण करतो. ||
|| जो सतत स्वत:मध्ये ईश्वर पाहतो, तो ईश्वर समीप असतो. ||
|| भक्ती करताना शरीर निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं. ||
|| तुम्ही जगाचे कल्याणम करा, ईश्वर तुमचे करेल. ||
|| मन निरोगी राहाण्यासाठी शरीर निरोगी हवं. ||
|| गुरू म्हणजे गुरूंचा स्थूल देह नाही. गुरूंच्या देहात जे चेतन तत्त्व आहे, ते म्हणजेच गुरू होय. ||
|| येणारा काळ अत्यंत प्रतिकूल असेल त्या काळामध्ये नामसाधनेत असणाराच तरेल. ||
|| दृष्ट विचारांना नष्ट करण्यासाठी नामस्मरण, चिंतन करणे महत्त्वाचे आहे. ||
|| नामजपातून मनाच्या व्यथा तर दूर होतातच, पण मन:शांतीही मिळते. ||
|| सध्याच्या खडतर काळासाठी नियमित साधना आवश्यक. ||
|| संतांच्या मार्गाने भक्ती केल्यास ईश्वर प्रसन्न होतो. ||
|| संत आहेत त्या स्थळी अधर्म टिकणार नाही. ||
|| संतांचे कार्य एकाच ईश्वरासाठी आहे. ||